हिमायतनगर प्रतिनिधी/- नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते.गुरूवारी उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली शिवसेना उबाठा गट व कांग्रेस युतीतर्फे प्रभाग क्रमांक 02 मधून विजयी नगरसेवक विनोद गुंडेवार यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली.त्यांनी 13 मते मिळवत महायुतीचे उमेदवार सुभाष बलपेलवाड मते 05 यांचा पराभव केला. स्वीकृत सदस्यपदी शिंदे शिवसेना भाजपा महायुतीचे डॉ राजेंद्र वानखेडे यांची निवड करण्यात आली.हि निवड प्रक्रिया
नगराध्यक्ष तथा पिठाशीन अधिकारी शेख रफिक शेख महेबुब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.अर्ज स्विकारणे छाननी व निवड प्रक्रियेची प्रशासकीय कामकाज मुख्याधिकारी सुर्यकांत ताडेवाड यांनी पार पाडले निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी आतिषबाजी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला.
या संपूर्ण निवडणुकीत नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. निवडी प्रसंगी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.निवडीबद्दल खा.नागेश पाटील आष्टीकर,माजी आ.जवळगावकर यांनी करून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी नगराध्यक्ष शेख रफिकभाई सुभाष राठोड, डॉ प्रकाश वानखेडे,तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काईतवाड, गटनेत्या दर्शंना रमेश पंडित,गटनेते विठ्ठल ठाकरे, गटनेते सरदार खान,माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड,अ.अखिल भाई, सभापती जनार्दन ताडेवाड,यलप्पा गुंडेवार , गणेश शिंदे, शिवाजी पाटील,संजय पाटील, फेरोज खान,बाळू पाटील, नगरसेवक, मिर्झा जिशान बेग,बाळू मेंडके, इलियास भाई, रमेश पंडित,मुजतबा मतीन, संजय माने, राजू जैस्वाल, संजय बोड्डावार,योगेश चिलकावार,खालीद मतीन,नितेश जैस्वाल, प्रकाश रामदीनवार, ज्ञानेश्वर पालीकोंडवार,दिपक कात्रे,धर्मपुरी गुंडेवार,हानिफ भाई, उपस्थित होते उपनगराध्यक्षासह नगराध्यक्ष नगरसेवकांची भव्य मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात परमेश्वर मंदिर मार्गे माता कालींका देवीकडे वाजत गाजत गुलालाची उधळण करीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाली उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार यांनी श्री परमेश्वर चरणी व माता कालींका देवीचे दर्शन घेतले आहे.या प्रसंगी बोलताना उपनगराध्यक्ष म्हणाले की या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवकांना घेऊन जनतेच्या हिताचे काम करणार असल्याचे सांगितले आहे.
