माजी आ.प्रदीप नाईकांनी शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी लढा दिला त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी - मा.आ.जवळगावकर

 हिमायतनगर प्रतिनिधी/- आदिवासी बहुल भाग असलेल्या किनवट ईस्लापूर शिवणी भागांतील जनतेच्या प्रश्नासाठी अहोरात्र मेहनत करून गेल्या चाळीस वर्षापासून परिश्रम घेतले त्यांच नांव आजही या भागातील जनता विसरू शकत नाही आम्ही देखील विसरणार नाही असे समाजातील वंचितांसाठी प्रेरणादायी कार्य माजी आमदार स्व.प्रदीप नाईकांचे होते त्यांच्या आठवणींना घेऊन एक मोठं कर्तृत्ववान नेतृत्व आज आमच्यात नाही याच दुख होत असल्याचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी व्यक्त केले आहे.
      इस्लापुर येथे आयोजित किनवट येथील लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.सुजाताताई एंड्रलवार व हिमायतनगर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांचा व महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर,मा.बेबीताई प्रदीप नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतीबा खराटे,के.मुर्ती, विनोद भरणे उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार,किनवट उपनगराध्यक्ष ,घोगरे पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, समदखान ,तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, सभापती जनार्दन ताडेवाड,विठ्ठल ठाकरे, सरदार खान,कुणाल राठोड, संजय माने, अब्दुल कलीम, इलियास भाई, रमेश पंडित, संभाजी मेंडके, योगेश चिलकावार दिपक कात्रे, सुमित कांगणे, प्रदीप जाधव,यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
      या सत्कार सोहळ्यात व्यासपीठावर बोलताना माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढविण्याचा प्रयत्न राहणार आहे.किनवट शहरासह हिमायतनगर शहरातील जनतेचा विश्वास स्थानिक पातळीवर केलेल्या विकास कामाची पावती मतदारांनी दिली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत देखील हेच चित्र असणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील काम केले पाहिजे या भागात माजी आमदार प्रदीप नाईक यांनी जनतेसाठी परिश्रम घेतले शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले त्यांचे अधुरं स्वप्न साकार करण्यासाठी आमच्या भगीनी बेबीताई नाईक ह्या नेतृत्व करीत असुन येणाऱ्या काळात मतदारांनी त्यांना साथ द्यावी असे आवाहन माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.