छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरूणांसाठी र्प्रेरणादायी- डॉ गफार कार्लेकर

हिमायतनगर प्रतिनिधी / रयतेचे राज्य बहुजन प्रतिपालक छञपती शिवाजी महाराज यांची जयंती आज घरा घरा साजरी केली जात आहे. माञ आजच्या तरुनांनी राजेंना डोक्यावर घेण्या पेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ गफार यांनी केले आहे.
तालुक्यातील कारला येथे आयोजीत शिवज्मोत्सवा निमित्त. 
पुढे बोलतांना डॉक्टर गफार कार्लेकर म्हणाले की आज प्रत्येकांना शिवाजी जन्माला यावे वाटते परंतु त्या अगोदर जिजाऊ जन्माला यावे लागेल त्या साठी महीलांनी एक वेळेस ऊपवास धरु नका. किंवा पारायण करु नका परंतु आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षणा बरोबरच संस्कार द्यावे लागतील तर आणि तरच आपल्यात शिवाजी घडु शकेल. तरुनांनी सुध्दा छञपतींना डोक्यावर घेण्या पेक्षा त्यांचे विचार डोक्यात घ्यावे हिच खरी शिवजयंती असेल असे ते म्हणाले 
 यावेळी सरपंच गजानन पाटील कदम. पोलीस पाटील साईनाथ कोथळकर.आकाश मोरे. भाऊराव मोरे. अविनाश पाटील लुम्दे. गणराज पाटील. शिवम मिरासे. वसंत मिरासे. आनंदराव सूर्यवंशी. यांच्यासह आदींची उपस्थिती होती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.