जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या तालुकाक्षपदी नारायण काळे हिमायतनगर पं.स.कार्यालात पदाधिकाऱ्यांचा सत्कार

 हिमायतनगर प्रतिनिधी/-जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाची हिमायतनगर तालुक्याची कार्यकारणी श्री अशोक कासराळीकर विभागीय अध्यक्ष महासंघ श्री हनुमंत वाडेकर जिल्हा मानद अध्यक्ष श्री कमल दर्डा जिल्हाध्यक्ष लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.
 जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी श्री नारायण काळे सचिव पदी श्री नागमवाड कार्याध्यक्षपदी श्री करेन्ना शिल्लेवाड कोषाध्यक्षपदी श्री मारुती मुधोळकर व मानद अध्यक्षपदी श्री सुशील कुमार शिंदे यांची सर्वानु मते निवड करण्यात आली असुन निवडीबद्दल सर्वांचा सत्कार करण्यात आला आहे.

हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयात सोमवारी जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी यांची तालुका कार्यकारणी श्री अशोक कासारळीकर विभागीय अध्यक्ष महासंघ तथा लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना श्री कमल दर्डा जिल्हाध्यक्ष लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना श्री हनुमंत वाडेकर मानद अध्यक्ष कर्मचारी महासंघ यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली त्या मध्ये तालुका अध्यक्ष अद्वैत अविनाश देशपांडे सचिव श्री शिवाजी पांचाळ कोषाध्यक्ष शेख मझहर कार्याध्यक्ष बालाजी शेळके उपाध्यक्ष शेख नाईम,श्री उत्तम मेश्राम संघटक श्रीपाद भोरे, श्री के. डी.वागतकर,श्री बी. एल. सातपुते महिला प्रतिनिधी बुद्धेवार व इतर तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी तालुकाध्यक्ष श्री उल्हास काळे यांची निवड करण्यात आली आहे.या निवडी प्रसंगी अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या आहेत जिल्हा परिषद कार्यालयात अनेक कामांसाठी कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही तसेच वेतन बाबतीत मुद्दे उपस्थित केले आहेत.सर्वांच्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.