राजा भगीरथ जयंती निमित्त कारला येथे अजय महाराज यांचे बुधवारी किर्तन.

हिमायतनगर प्रतिनिधी/- तालुक्यातील कारला येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही राजा भगीरथ जयंती सोहळ्या निमित्त भव्य किर्तन सेवा आयोजन करण्यात आले असुन या भक्तीमय कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
    नांदेड जिल्हयात कारला येथे राजा भगीरथ यांच भव्य मंदिर आहे.या ठिकाणी दरवर्षी दि.14 जानेवारी बुधवारी मकरसंक्रांत दिनी व राजा भगीरथ जयंती निमित्त ह.भ.प.अजय महाराज महाजन यांची किर्तन सेवा होणार आहे.या जयंती सोहळ्यात होणाऱ्या भक्तीमय कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बेलदार समाज बांधव,सगरवंश मंडळ ग्रामस्थांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.