हदगाव प्रतिनिधी/- हदगाव शहरासह ग्रामीण भागात गेल्या 25 वर्षांपासून साक्षी ब्यूटी पार्लर ने यशस्वी काम केले असुन अनेक विद्यार्थ्यांना घडवीले आहे.याचबरोबर या ब्यूटी पार्लरने नावलौकिक मिळविला असुन ब्युटी पार्लर प्रशिक्षण घेतलेल्या सर्व ब्यूटीशयन चा ट्राफी सन्मानचिन्ह देऊन संचालिका सौ.गौदावरी सादुलवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
हदगाव शहरात गेल्या पंचवीस वर्षापासुन साक्षी ब्यूटी पार्लरने आपल्या व्यवसायात भरारी घेतली आहे.सध्या महिलांचा ब्युटी पार्लर या व्यवसायाकडे महिलांचा ओघ सुरू आहे. आजच्या घडीला शहरासह ग्रामीण भागातील महिला वर्ग अतिशय चांगला उद्योग म्हणून पार्लर व्यवसायात महिलांनी आघाडी घेतली असुन साक्षी ब्यूटी पार्लर ला आजही मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा वाढता कल आहे.
त्यानिमीत्त ब्यूटिशन अँन्ड मेकअप आर्टिस्ट यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला उपस्थित सर्वांचा साक्षी ब्यूटी पार्लर च्या वतीने सन्मानचिन्ह ट्राफी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे यावेळी नगरसेविका सौ.सुनंदाताई भोळे ,खके मॅडम, यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.साक्षी ब्यूटी पार्लर च्या संचालक सौ.गोदावरी संदीप सादूलवार यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
