हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित तहसीलदारांना निवेदन - अनुदान यादीमध्ये नाव असुन देखील खात्यात जमा झाले नसल्यामुळे शेतकरी संतप्त

हिमायतनगर प्रतिनिधी/- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आले आहे हिमायतनगर तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांना अनुदान खात्यात जमा झाले असले तरी यातील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले असून शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही अनुदान जमा झाले नसल्यामुळे सोमवारी तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे अनुदान जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
हिमायतनगर तालुक्यात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील तिचे खरडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यासह शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून अनुदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आली तसेच रब्बी हंगामा करिता दहा हजार रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यात आठ दिवसापूर्वी जमा करण्यात आले आहेत. अनुदाना याद्यांचे तलाठ्याकडून मूल्यांकन होऊन सदरील याद्या प्रसिद्ध देखील करण्यात आले आहेत त्या यादीमध्ये शेतकऱ्यांचे नाव असून देखील संबंधित शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारी तहसीलदार यांची भेट घेऊन सदरील प्रकार सांगितला आहे याबाबत लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाची प्रत कळवून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले तसेच अनेक शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव दुरुस्ती फार्मर आयडी केवायसी केली नसल्यामुळे शेतकऱ्यांची नावे यादीत आले असले तरी अनुदान खात्यात जमा झाले जमा झाले नाहीत अशा शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार यांना निवेदन दिले आहे निवेदनावर अब्दुल गफार कार्लेकर संजय कदम दिलीप सावळे यशवंतराव डोलारीकर अब्दुल जुनेद सरस्वती साळवे ओमकार कदम कोकरे हनुमंता कांबळे अंकुश वाटोळे अब्दुल रहू यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षिणे स्वाक्षरीने निवेदन नायब तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले आहे या शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने खात्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.