निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे कापडी फलके, झेंडे लावणे इत्यादी बाबीस प्रतिबंध

नांदेड दि.9 नोव्हेंबर:- राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदांसह एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला आहे. त्यादिवशीपासून निवडणूक कार्यक्षेत्रात आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.
 
नांदेड जिल्ह्यातील नगर परिषद/नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून, या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी यादृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार स्थानिक स्वराज्य मतदारसंघ कार्यक्षेत्रासह नांदेड जिल्ह्यात निवडणूक कालावधीत प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे इत्यादी बाबीसाठी प्रतिबंध केला आहे असे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहे. 
                                                                                                                                                                                                                                                                                                                         फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रीन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून 2 फुट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनावर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजुनेच लावण्यात यावा. इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी यांच्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनावर लावता येणार नाही. 
हा आदेश नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ कार्यक्षेत्रात निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यत म्हणजेच दि. 3 डिसेंबर 2025 पर्यत अंमलात राहील. 
00000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.