हिमायतनगर प्रतिनिधी/ कारला येथे राजा भगीरथ जयंती व मकर संक्रांतीच्या निमित्ताने प.पू.बालयोगी गजेंद्र चैतन्य महाराज यांच्या किर्तन सोहळ्याचे आयोजन बेलदार समाज व ग्रामस्थांनी केले आहे
हिमायतनगर तालुक्यातील कारला येथे बेलदार समाज बांधवांच्या वतीने राजा भगीरथ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते यावर्षी दि.14 जानेवारी मंगळवारी कारला येथील राजा भगीरथ मंदिर येथे जयंती निमित्त प.पू.बालयोगी गजेंद्र चैतन्य महाराज यांच्या किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी 10 वाजता किर्तन सोहळ्यात सुरूवात होणार आहे.या किर्तन सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन बेलदार समाज बांधव ग्रामस्थांनी केले आहे
