हिमायतनगरः आपल्या घरी पशुधन राहिले तर दुहेरी फायदा होऊन त्यातुन मिळणाऱ्या उत्पन्नातून मानसीक समाधान मिळण्यास वाव आहे. दुर्दैवाने आजकाल पशुधनाची संख्या घटत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. आगामी वर्षात २०२६ मध्ये येथील होणाऱ्या यात्रेत जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग , पंचायत समिती आणि यात्रेच्या संयुक्त विद्यमाने देणा-या बक्षीसा शिवाय ५१ हजार रुपये वैयक्तिक बक्षीस देण्याची घोषणा आ बाबुराव कदम कोहळीकर यांनी केली.आगामी वर्षात पशुप्रदर्शनासाठी ८१ हजाराचे बक्षीस मिळणार आहेत.पशुपालकासह यात्रा कमिटीच्या वतीने आ कोहळीकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. पाचशिव महादेव फाटा येथील पार्श्वनाथ मंदिर यात्रेतील दुसऱ्या दिवशी पशुप्रदर्शनाचा शुभारंभ ७ जानेवारी रोजी आ बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी परमेश्वर देवस्थान कमिटी चे उपाध्यक्ष महावीरचंद श्रिश्रीमाळ, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विजयकुमार वळसे पाटील,आ कोहळीकर यांचे स्वीयसहाय्यक बबनराव कदम, विकास पाटील देवसरकर, सत्यवृत ढोले, प्रकाश जाधव, गजानन हरडपकर,संतोष पाटील कदम, पवन करेवाड,फेरोज खुरेशी,यांची ऊपस्थीती होती.यावेळी पुढे बोलताना आ कोहळीकर म्हणाले की,दुधाची प्रत्येकाना गरज असुन महाराष्ट्रात ३५ टक्के दुधाचे उत्पादन होत असल्याचे वृत्त आहे.पणीर पासुन बहुतांश पदार्थ दुधापासून तयार होत आहेत.आपल्या गो मातेच्या दुधाची चहा दुसऱ्या दुधाच्या चहा मध्ये देखील फरक आढळून येतोय याकडे लक्ष ठेवुनी पशुधनाची संख्या वाढवित असताना दुभत्या जनावरांची संख्या वाढवावी असे आवाहन केले. या पशुप्रदर्शनासाठी गाय, वासरू,वळु, बैलांची संख्या पासुन समाधान वाटत असुन पशुप्रदर्शनासाठी बक्षीसाची भरमसाठ संख्या रहावी,पशुपालकाचा उत्साह वाढावा या उद्देशाने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, यात्रा कमिटी व्यतिरिक्त आगामी २०२६ च्या पशुप्रदर्शनासाठी ५१ हजार रुपये प्रोत्साहन पर देण्याची घोषणा आ बाबुराव कदम कोहळीकर यांनी केली आहे. संचलन यात्रा कमिटीचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी केले.याप्रसगी पशुधन विस्तार अधिकारी डॉ योगेंद्र नागरगोजे येवतीकर, डॉ ऊमेश सोनटक्के, डॉ बिराजदार, डॉ पाटील, संदीप भारोटे, ज्ञानेश्वर फड, गजानन जक्कलवाड, आनंदराव लोखंडे, अजहर शेख, बालाजी मिराशे,कोठेकर, अंजनीकर, गोखले , नरवाडे ,कामनराव वानखेडे,गुणाजी आडे, गणेशराव भुसाळे,दिलीप आडे, एकनाथ बुरकुले, नागोराव बुरकुले, वामनराव जाधव ,रामदास भडंगे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पशुधनामुळे आपल्या परीवाराच्या उन्नतीसह मानसीक समाधानासाठी सर्वांनी घरासमोर, शेतात पशुधनाची संख्या वाढवावी - आ.बाबुराव कदम कोहळीकर.
0
January 08, 2025
