नांदेड जिल्ह्यात पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत जाहीर/ हिमायतनगर सभापती पद अनुसूचित जातीसाठी राखीव


नांदेड, दि. 10 ऑक्टोबर : नांदेड जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांतील सभापती पदांसाठी आरक्षणाची सोडत आज नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पार पडली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पद्धतीने प्रक्रिया पार पडली.

या सोडतीत पंचायत समिती निहाय सभापती पदांचे आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.
भोकर- अनुसूचित जाती (महिला),
हिमायतनगर- अनुसूचित जाती,
किनवट- अनुसूचित जाती,
उमरी- अनुसूचित जमाती,
मुदखेड- अनुसूचित जमाती (महिला),
नांदेड- नागरिकांचा मागास प्रवर्ग,
हदगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग,
नायगाव खै.- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),
लोहा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),
देगलूर- सर्वसाधारण (महिला),
मुखेड- सर्वसाधारण (महिला),
बिलोली- सर्वसाधारण (महिला),
धर्माबाद- सर्वसाधारण (महिला),
कंधार- सर्वसाधारण,
अर्धापूर- सर्वसाधारण
माहूर- सर्वसाधारण.

या सोडतीच्या प्रक्रियेस संबंधित अधिकारी, जनप्रतिनिधी तसेच विविध पंचायत समित्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांसाठी आरक्षण निश्चित झाले आहेत.
000000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.