हिमायतनगर प्रतिनिधी/ गुरु-शिष्यांचे नाते किती घट्ट असते याचा प्रत्यय करंजी जिल्हा परिषद शाळांमध्ये आला. नुकत्याच जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यात बदली झालेल्या शिक्षकांना शनिवारी त्यांच्या नव्या शाळेवर रुजू होण्याचे आदेश धडकले. यामुळे हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथील शिक्षीका सविता भुरे यांच्या बदलीने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी हंबरडा फोडला तर विद्यार्थीसह गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजी येथील विद्यार्थीप्रिय शिक्षका सविता भुरे माॅडमची नुकतीच बदली झाली. त्यांना निरोप देताना शाळेतील सर्वच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ढसाढसा रडायला लागले. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना रस्त्यात अडविले व शाळेचे मुख्य गेटही बंद करून घेतले. यावेळी उपस्थित माता पालक व शिक्षक यांचेही डोळे पाणावले होते.
अन् शिक्षकांचा अश्रूचा बांध फुटला
शाळेतील विद्यार्थी शिक्षिकाच्या गळ्यात गळा घालून रडायला लागले. त्यामुळे शिक्षीका यांना ही अश्रू अनावर झाले. ते सुद्धा विद्यार्थ्यांबरोबर रडू लागले. तर इतर शिक्षकांचाही अश्रूचा बांध फुटला. यावरून विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते कीती घट्ट होते. हे या प्रसंगावरून अधोरेखित झाले. तर आज दिवसभर या प्रसंगाचीच चर्चा ऐकायला मिळाली. पालकांचे डोळे पाणावले. भुरे माॅडम य्हा विद्यार्थ्यांना समजवून सांगत होत्य. मात्र विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रूची धार थाबत नव्हती.भुरे माॅडम हे विद्यार्थीप्रिय शिक्षिका आहेत. गेल्या सात वर्षांपासून त्या करंजी जिल्हा परीषद शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत होते पहीले ते चौथीपर्यंतच्या शाळा असून . त्यांची शिकवण्याची पध्दत, विद्यार्थ्याशी संभाषण करण्याच्या पध्दतीमुळे शाळेतील सर्व विद्यार्थ्याच्या आवडती शिक्षिका बनले होते त्यांचा शिस्तपणा ही वाखाण्याजोगी आहे असे शाळेचे इतर शिक्षक,ग्रामस्थ व व्यवस्थापन समतिचे यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलतांना सांगीतले.एकीकडे जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थ्याची संख्या दिवसेंदिवस घटतांना दिसत आहे. मात्र करंजी जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाच्या मेहनतीमुळे कदाचित चांगली पटसंख्या असणारी तालुक्यात करंजी जिल्हा परीषद शाळा जवळपास अव्वल क्रमांकावर दिसून येईल .
' *कोरोना'त ज्ञानकुंड तेवत*...
कोरोनात सर्वत्र शाळा बंद होत्या. शाळा आणि विद्यार्थ्याचे नाते संपुष्टात येते की काय? असा प्रश्न उपस्थीत होऊ लागला होता. विशेषत: जिल्हा परीषद शाळांची मोठी दैना झाल्याची पहावयास मिळाले. मात्र करंजी येथील शिक्षकांनी कोरोनात ही विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्यात दुरावा येऊ न देता शिक्षणाची ज्योत निरंतर तेवत ठेवली. पहील्या लाटेत काहीप्रमाणत व्यत्यय आला.त्यावेळेस ऑनलाईन च्या माध्यमातून शिक्षण दिले. मात्र दुसर्या लाटेत पटांगणात विद्यार्थ्यांची शाळा भरवून विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम भुरे माॅडम व राठोड सरानी केले. त्यामुळे एकीकडे शाळा बंद असताना कोरोनाचे नियमाचे पालन करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा भरवली .
*या दोन्ही शिक्षकांनी इतरांसमोर आदर्श उभा केला *
भुरे माॅडम विद्यार्थ्याना शिकवण्यातुन इतक आपलेसे केले होते की, त्यांची बदली झाल्यावर विद्यार्थी धाय मोकलून रडू लागले. यावरून त्यांची विद्यार्थीप्रियता दिसुन येते. विद्यार्थ्यानाच नाही तर त्याच्यां सहकारी शिक्षक व गावाकऱ्यांना अश्रू अनावर झाले. एकीकडे फक्त पगारापुरते शिकवणारे शिक्षक आणि दुसरीकडे बदली झाली म्हणुन रडणारे विद्यार्थीप्रिय शिक्षकांची तुलना तालुक्यात चर्चीली जात आहे. यामुळे देवकते सर यांचे कार्य इतरांसाठी आदर्शवत ठरले आहे.
ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होतेच. पण शिस्तप्रिय तेवढ्यचं होते
