हिमायतनगर प स सभापती पदाचे अनेकांना लागले डोहाळे ? चार गणाची आरक्षण सोडत सोमवारी

हिमायतनगर प्रतिनिधी / हिमायतनगर तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट तर चार पंचायत समिती गण आहेत.त्यामध्ये पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सोडत जाहीर झाली असून हिमायतनगर पं.स.चे सभापती पद हे अनुसूचित जाती पुरूषा करीता सुटले असल्यामुळे अनेक इच्छुकांना सभापती पदाचे डोहाळे अनेकांना लागले असले तरी कोणत्या गणात अनुसूचित करीता जागा सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .

हिमायतनगर तालुक्यात गेल्या चार वर्ष्यापासून स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका घेतल्या नसल्यामुळे आजपर्यंत या
पं.स.वर प्रशासन कारभार पाहत होते.
त्यामुळे पं.स.मध्ये ग्रामीण भागातील गोरगरीब सामान्य जनतेची कामे खोळंबली होती दि. १० आक्टोबर रोजी नांदेड जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांतील सभापती पदांसाठी आरक्षणाची सोडत नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पार पडली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पद्धतीने प्रक्रिया पार पडली आहे यामध्ये हिमायतनगर येतील सभापती पद हे अनुसूचित जाती करीता सुटले असल्यामुळे अनेक पक्षातील इच्छुक सभापती होण्याचे स्वप्न पाहत आहेत.

परंतु पं. स. गणाचे आरक्षण सोडत सोमवारी होणार असल्यामुळे अनुसूचित जाती करीता चार पं.स. गणा पैकी कोणता गण अनुसूचित जाती करीता सुटणार याकडे अनेकांच्या नजरा लागून आहेत. सोमवारी आरक्षण सोडत झाल्यानंतर सभापती कोणत्या गणाचा होणार हे कळणार असले तरी सभापती पदाचे डोहाळे अनेकांना लागले असल्याचे राजकीय चित्र दिसत आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.