एलएलबीच्या प्रथम श्रेणीत कानबा पोपलवार यांचे यश परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने सत्कार

हिमायतनगर प्रतिनिधी/तालुक्यातील मौजे टेंभी येथील रहिवासी असलेले  संपादक कानबा पोपलवार यांनी एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केल्यामुळे त्यांना पुढील वकील व्यवसायासाठी परमेश्वर मंदिर ट्रस्ट च्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ परमेश्वर मंदिर ट्रस्टचे सचिव अनंता देवकते यांच्यासह मंदिराचे सदस्य विलास वानखेडे यांनी अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी वकिली करण्याची अपेक्षाही व्यक्त केली.

हिमायतनगर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असणारे माजी सरपंच कानबा पोपलवर यांना गोरगरिबांच्या सुखदुःखाची चांगली जाणीव असून या माध्यमातून ते गोरगरीबांना जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काम करतील असी अपेक्षा व्यक्त केली.पत्रकारीता ते एलएलबीच्या प्रथम श्रेणीत यश संपादन केल्याबद्दल परमेश्वर मंदिर ट्रस्ट च्या वतीने पोपलवार यांचा सत्कार केला.या सत्कार उत्तर देताना अँड कानबा पोपलवार म्हणाले की सत्कार हि पुढील जबाबदारी देणारा असुन आपण सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी हि पदवी प्राप्त केली असल्याचे सांगितले आहे 

 यावेळी पत्रकार  अनिल भोरे , संपादक पांडुरंग गाडगे टेंभी येथील उप सरपंच आनंदराव मूतणेपाड अर्शद खान पठाण, पंडीत ढोणे, नागोराव शिंदे,यांच्यासह परमेश्वर मंदिर ट्रस्टचे संचालक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 
 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.