वै.गु. भिकाजी बाबा यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय सामुहिक खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक संगीत संचानी सहभाग घेतला होता या स्पर्धेत नांदेडच्या नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या संचाने प्रथम क्रमांक पटकावला आहे
राज्यातील सर्व भाविक भजनी मंडळाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व्हावे, सांप्रदायीक भाविकांचा भक्तीभाव वाढीस लागावा या उद्दात हेतूने रविवार दि.२६/०१/२०२५ रोजी सांयकाळी पुण्येश्वर महादेव मंदिराच्या पायथ्याशी फुलसावंगी येथे सामुहीक खुल्याभजन स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेचे उद्घाटन भगिरथजी नाईक, श्री. पुंडलीकजी भुरके, तिवरंग, श्री. अरुणजी धकाते, सी. सारजाबाई ग. वाघमारे (सरपंच-फुलसावंगी), श्री. दिनेशजी नाईक (उपसरपंच फुलसावंगी), श्री. राजेशजी नाईक (पोलीस पाटील फुलसावंगी) श्री. योगेशजी वाजपेजी, श्री. अरुणजी पांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेचे प्रथम बक्षीस भाजपा जिल्हा समन्वयक नितिनभाऊ भुतडा यांच्या तर्फे तिस हजार रुपये होते तर द्वितीय बक्षीस राष्ट्रीय काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष अँड सचिन नाईक यांच्या तर्फे विस हजार रुपये, तृतीय बक्षीस ह.भ.प.प्रमोदराव देशमुख यांच्या तर्फे अकरा हजार रुपये ठेवण्यात आले होते.असे एकुण 85 हजार रुपयांचे बक्षीस या स्पर्धेसाठी अनेक दात्यांनी ठेवली होती.हि स्पर्धेचे नियम अटी लागू होत्या प्रत्येक संघास २० मिनीटांचा कालावधी ,प्रत्येक संघास ७ व्यक्ती बंधनकारक राहतील, दोन अभंग, एक अभंग संत तुकाराम यांच्या हाथेतील) व दोन अभग संत नामदेव महाराज यांच्या (गाथेतील) व तसेच एक गवळण हि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या गाथेतील असावी व तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी हाराज यांच्या स्वलिखीत (गाथेतील) एक पद असावी यासह अनेक नियम अटीनुसार स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेचे प्रथम बक्षीस नांदेड येथील नादब्रह्म संगीत विद्यालयाने पटकावले आहे.यामध्ये
सहभागी कलावंत प्रा. राजेश ठाकरे, प्रा. प्रणव पडोळे , श्री. विष्णू पिंगळीकर, शिवाजीराव विभुते , अशोक बोंपिलवार तबलावादक सचिन बोंपिलवार ,पखवाज वादक कृष्णा महाराज बोंपिलवार
या टीमने प्रथम क्रमांक पटकावला आहे.त्याबदल संगीत विद्यालयाचे कौतुक केले आहे.समस्त वै.गु. भिकाजी बाबा शिष्य परिवाराच्या वतीने सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला आहे.
