हिमायतनगर तहसील कार्यालयात तिन दिवस कॅम्पचे आयोजन संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आधारकार्डशी मोबाईल क्रमांक लिंक करावा - तहसीलदार पल्लवी टेमकर यांचे आवाहन

हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यातील संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांना आता थेट डि.बी.टी.द्वारे अर्थसहाय्याचे वितरण करण्यात येणार असुन या करीता पात्र लाभार्थ्यांनी आपल्या आधारकार्डशी मोबाईल क्रमांक लिंक करून घ्यावा असे आवाहन तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय, मुंबई यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डि.बी.टी. द्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार
जिल्हाधिकारी नांदेड यांनी माहे फेब्रुवारी 2025 पासुनचे अर्थसहाय्य केवळ डि.बी.टी. पोर्टलवर Onboard व Aadhar Validate झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे असे निर्देश दिले आहे.त्यानुषंगाने हिमायतनगर तालुक्यातील काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने मंडळ निहाय कॅम्पचे आयोजन करण्यात येत असून आपल्या तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्डाशी मोबाईल क्रमांक (आधार सेंटरवर) लिंक करुन बैंक पासबुक खात्याची झेरॉक्स आणी चालु मोबाईल नंबर तसेच हयात प्रमाणपत्र यापुर्वी सादर केले नाही त्यांनी संलग्न करणे साठी तहसिल कार्यालयात सादर करावेत हिमायतनगर मंडळ विभागातील लाभार्थ्यांसाठी दि.30 ते 31 जानेवारी कॅम्प घेण्यात येणार आहे तर सरसम बु.मंडळातील लाभार्थ्यांसाठी दि.3 ते 4 फेब्रुवारी रोजी कॅम्प असणार आहे,जवळगाव मंडळातील लाभार्थ्यांसाठी दि.5 ते 6 फेब्रुवारी असा तिन दिवस कॅम्पचे आयोजन तहसील कार्यालयात सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठेवण्यात आले आहे.
सदरील माहिती सादर न केलेल्या लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. याबाबत सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी व आपले कागदपत्र वर नमुद केलेल्या कॅम्पच्या दिनांकावर आपण स्वतः आधार संलग्न मोबाईल सह हजर राहावे. असे आवाहन तहसिलदार पल्लवी टेमकर यांनी केले आहे


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.