राजकीय जिवनात पक्ष आणि कार्यकर्ता जपून ठेवणे हे ज्या नेत्यांना जमते तिच माणसं राजकीय जिवनात मोठ्या शिखरावर पोहचत असतात असाच लोकनेता हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघांत जन्माला आला ते म्हणजे लोकनेते माधवराव पाटील जवळगावकर अतिशय मनमिळावू साधी राहणं उच्च विचार हि जवळगावकर घराण्याची ओळख आहे.तिन पिढ्यांपासून राष्ट्रीय काँग्रेस पक्षांशी एकनिष्ठ राहून मतदारसंघात राजकीय उलथापालथ केली.एकनिष्ठ असल्याने जवळगावकरांना पक्षाने सतत पाच वेळा विधानसभेची उमेदवारी दिली जनतेशी नाळ असलेल्या जवळगावकरांना तिन वेळा मतदारांनी नेतृत्वाची संधी दिली दिलेल्या संधीचे सोने करून हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा जवळगावकरांच्या रुपाने मिळाली आहे.सर्वांच्या समस्या म्हणजे आपल्याच समस्या समजून त्या सोडविण्यासाठी रात्रीचा दिवस करण्याची हातोटी माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी आजही चालुच ठेवल्यामुळे तळागाळातील वर्गासह सर्वांनाच ते आपलेसे वाटतात.
आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी वडील कै. निवृत्तीराव पाटील पवार, बंधू कै.पंजाबराव पाटीज जवळगावकर यांच्या कार्यपध्दतीचे अनुकरण करुन आई माजी जि.प.अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार यांच्या सानिध्यात राहून कामे करुन जनतेची मने जिंकली आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्याशी अतुट असे प्रेम होते . माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कांग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर जवळगावकर यांनी मात्र पक्ष सोडला नाही निवडणुकीत कितीही आरोप झाले तरी देखील न डगमगता कार्यकर्त्यांच्या ताकदीवर पक्षांशी एकनिष्ठ राहून लोकसभासह विधानसभा निवडणुकीत सक्रिय राहून काम करीत हिंगोली लोकसभा मतदारसंघाची जागा निवडून आणण्यात यश मिळाले.
परंतू 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने राज्यात बदल घडला असल्याने यात जवळगावकर यांचा पराभव झाला निवडणुकीत पराभव झाला असला तरी पराभव मान्य करून पुन्हा त्याच जोमाने जनतेच्या सुख दुःखात सहभागी होऊन सामान्य जनतेच्या कामांना प्राधान्य देण्यात जवळगावकर अग्रेसर आहेत.
आपल्या कार्यकुशलतेमुळे गरीबासह श्रींमत वर्गाना आ.माधवराव पाटील जवळगावकर म्हणजे आपल्या परिवारातील पालक,भाऊ असे ह्रदयात ठाण करुन ते बसल्यामुळे मतदार संघातील कोणी आपली इच्छा पुर्ण होत नसल्यामुळे त्यांना सोडून गेले तरी आ.जवळगावकर यांच्या कर्तबगारीचा ठसा कायम मनावर बसलेली जनता मात्र त्यांच्या सोबत असल्याचे चित्र दिसत आहे.
सध्या तरी नांदेड जिल्ह्यात अनेकजण कांग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत असले तरी जवळगावकर यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काम करतांना पक्षाची शान, मान वाढविण्याचे काम ते अहोरात्र करीत आहेत. पक्षश्रेष्ठीसह सामान्यांच्या मनात घर करुन जनतेला आपलेसे करणारे व विकासाला प्राधान्य देवून मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधण्याचा नेहमी प्रयत्न आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केला आहे. राजकारण व समाजसेवेचा वारसा आणि गोरगरिब, वंचित व उपेक्षितांच्या सेवेचा आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी वसा घेतलेला असल्याने हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील जनताही त्यांच्या पाठीशी हिमालयासारखी उभी राहात आली. समाजसेवा व सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्याच्या त्यांच्या प्रामाणिक कार्यामुळे हजारोंच्या संख्येने ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले.
मधूरभाषी स्वभाव, कमी बोलणे व जास्त काम करणे व कुशल संघटन कौशल्य, यामुळे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांची लोकप्रिय नेते म्हणून सर्वदूर ओळख निर्माण झाली. जवळगावकर हे कांग्रेस पक्षातील एक विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तालुक्यातील जनतेने त्यांना स्पष्ट जनाधार देऊन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठविले होते. जनतेच्या आशीर्वादाची जाण ठेवून त्यांनी आपल्या आमदारपदाच्या कार्यकाळात हदगाव- हिमायतनगर तालुक्यात विकासाची गंगा आणली. विकासाचे अनेक लहान- मोठी कामे त्यांनी पूर्ण केली. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडुण आल्याने उर्वरीत कामांनाही गती मिळाली आहे. त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन असल्यानेच जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत त्यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई पाटील जवळगावकर यांना जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिले. जवळगावकर हे अत्यंत विश्वासू आणि विकासाची जाण असलेले नेते असल्याने श्रीमती शांताबाई पाटील जवळगावकर यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड केली होती.
अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात पारदर्शक कारभार करुन हदगाव-हिमायतनगर तालुक्यात अनेक विकास कामे केली. सार्वजनीक बांधकाम मंत्री, पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे सध्या भाजपात असले तरी जवळगावकरांचे राजकीय गुरू हे चव्हाण असल्याचे ते सांगतात सर्व जनतेच्या आर्शिवादामुळे ह्रदयविकाराच्या दुःखातून दुसर्यांदा जन्म झाल्याचे ते वारंवार सांगत असतात. पुढील आयुष्य हे माझ्या जनतेसाठीच अर्पण केल्याचे ते सांगतात अनेकांच्या ह्रदयाला पाझर फुटतो. सुखासह दु:खात सहभागी होणारा असा हा लोकप्रिय नेता आ.माधवराव पाटील जवळगावकर यांना दै.पुण्य नगरी परिवारांच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
संकलन---
सोपान बोंपिलवार
तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
