हिमायतनगर प्रतिनिधी/ हिमायतनगर समाज घडविण्यासाठी आपले आयुष्य झिजविणारे बालयोगी आचार्य गजेंद्र चैतन्य महाराज यांच्या पुढाकाराने अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी येथील लहरीबाबा समाधी मंदीर कलशारोहण सोहळ्यानिमित्ता शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानिमित्त हिमायतनगर तालुक्यातील विरसणीपासून मधापुरीपर्यंत २७ जानेवारीपासून ३ फेब्रुवारीपर्यंत भाविकांची पायी वारी दिंडी निघणार आहे. विरसनी येथुन २७ जानेवारी रोजी पायी वारी दिंडी निघाल्यानंतर पहिला मुक्काम ढाणकी, पुन्हा टेंभी, लोणबळ, जवळा, दारव्ह, ऊमरगा बाजार, माटोडा असा मुक्काम राहणार आहे. भक्तांनी पायी वारी दिंडीत सहभागी व्हावे, असे आवाहन बालयोगी गजेंद्र चैतन्य महाराज यांनी केले आहे.कलशारोहणाचे महंतासह महाराजांना निमंत्रण
मधापुरी ता. मुर्तिजापूर येथील श्री परमहंस ब्रम्हानंद लहरी बाबा यांच्या समाधी मंदिर कलाशारोहन सोहळ्याचे पपुआचार्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्य महाराज यांनी दत्तबर्डी संस्थान हदगाव येथील महंत श्री श्नी १००८ गोपाळ गिरीजी महाराज, श्री दत्त संस्थान पिंपळगावचे मठाधिपती प. पु. बालयोगी व्यंकटस्वामी महाराजाना निमंत्रण दिले आहे.
