राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान


हिमायतनगर प्रतिनिधी/दि. २३ जानेवारी :- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे आज श्री. गुरुगोविंद सिंघ जी नांदेड विमानतळावर १०.४५ ला आगमन झाले. लगेच ते ११ वाजता परभणीला नियोजित दौऱ्यावर रवाना झाले. आज 23 जानेवारीला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे दीक्षांत समारंभ होत आहे. त्यासाठी ते नांदेड विमानतळावर आले होते. दुपारी ३ वाजता ते मुंबईला परत प्रयाण करणार आहेत.

विमानतळावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,आमदार डॉ. तुषार राठोड यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे उपस्थित होते.
0000

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे मुंबईकडे प्रस्थान

नांदेड दि. २३ जानेवारी :- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज परभणी येथील कार्यक्रम आटपून दुपारी तीनच्या सुमारास मुंबईकडे प्रयाण केले.

सकाळी ११ वाजता त्यांचे परभणीच्या नियोजित दौऱ्यासाठी आगमन झाले होते
   
श्री. गुरुगोविंद सिंघ जी नांदेड विमानतळावर निरोप देण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.