हिमायतनगर प्रतिनिधी: इतर मागास बहुजन कल्याण विभाग लातूरमार्फत उदगीर येथे घेण्यात आलेल्या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत जगदीश शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मनीषा आश्रम शाळा जगदीशनगर पोटा बु. तालुका हिमायतनगर या आश्रम शाळेच्या १४ वर्षे वयोगटातील हॉलीबॉल संघाने प्रथम क्रमांक मिळविला आहे.
विजयी संघाचे दिलीप कुमार राठोड, प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग लातूर व शिवानंद निमगिरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड, संस्थेच्या अध्यक्षा सौ. शशिकला उत्तमराव राठोड, उपाध्यक्ष उत्तमराव राठोड, सचिव डॉ. मनीषा राठोड, जगदीश राठोड, प्राचार्य सुनील चव्हाण, मुख्याध्यापक नारायण गाडे संघाचे प्रशिक्षक, प्राध्यापक सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले.
विद्यार्थी जीवनामध्ये शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी खेळाकडे लक्ष देऊन खेळातूनही आपले कॅरिअर घडविण्याचे काम करावे व आपल्या आई-वडिलांच्या स्वप्नांना साकार करावे, विद्यार्थी जीवनामध्ये जिद्द, मेहनत व प्रबळ इच्छाशक्तीवर आपणास निश्चितच समाधानकारक मार्ग मिळतो, तेंव्हा विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आपली वर्तणूक व खेळाडू वृत्ती जोपासून खेळाकडे लक्ष द्यावे, निश्चितच विद्यार्थी जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष उत्तमराव राठोड यांनी केले.
लातूर विभागातून मनीषा आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी हॉलीबॉल खेळामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे गावकरी पालक वर्ग परिसरातील क्रीडाप्रेमी नागरिकांतून शाळांचे गुरुजन वर्ग व विद्यार्थ्यांचे कौतुक केल्या जात आहे.
