हिमायतनगर प्रतिनिधी/ हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातुन कांग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना पुन्हा महाविकास आघाडी कांग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली असुन आ.जवळगावकरांना सलग पाचव्यांदा उमेदवारी देऊन पक्षांशी असलेला एकनिष्ठपणा सिध्द झाला आहे . उमेदवारी जाहीर होणार नाही अशा वावड्या उठवणाऱ्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे तर जवळगावकर समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला आहे.
हदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी कांग्रेस पक्षातील इच्छूकांनी गर्दी केली होती. कांग्रेस पक्षाकडून विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना उमेदवारी नाकारली जाणार असल्याच्या चर्चा राजकीय गटात सुरू झाल्या होत्या.परंतू आ.जवळगावकर यांनी कांग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ राहिले आणि पक्षविरोधी भुमिका कधीही केली नाही त्यामुळे जवळगावकरांना विधानसभेसाठी पुन्हा महाविकास आघाडी कांग्रेस पक्षाकडून सलग पाचव्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे.कांग्रेंस पक्षातील मोठे नेते भाजपात गेल्यामुळे जवळगावकर देखील भाजपात जाणार असल्याच्या चर्चेला उमेदवारी मिळाल्या मुळे पूर्णविराम मिळाला आहे.अनेकांनी जवळगावकरांना पक्षविरोधी ठरविण्याची भुमिका घेऊन दिल्ली गाठली होती.तरी देखील जवळगावकरांच्याच नावावर पक्षश्रेष्ठीने शिक्कामोर्तब केला असल्यामुळे इच्छुकांच्या प्रयत्नाना अपयश आले असून त्यांना धक्का बसला आहे.जवळगावकर गटातील कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन आ.जवळगावकर यांनी केले आहे.
हदगाव विधानसभा मतदारसंघातुन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांना सलग पाचव्यांदा उमेदवारी जाहीर केल्याबद्दल कांग्रेस नेत्या सोनिया गांधी, नेते राहूल गांधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, जिल्हाध्यक्ष यांच्यासह कांग्रेस पक्षश्रेष्ठीचे आ.जवळगावकर यांनी आभार व्यक्त केले आहे.
