नालंदा बौद्ध विहारात भगवान गौतम बुद्ध धम्म ग्रंथाचा समारोप

 हिमायतनगर प्रतिनिधी( काशिनाथ पोपुलवार)
/शहरातील नालंदा बौद्ध विहार येथे भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे वाचन तिन महिने करण्यात आले आहे.या ग्रंथाचा समारोप भंते पय्यादीप यांच्या उपस्थितीत झाला आहे.
बुद्ध विहार येथे रोजी वर्षावासानिमित्त बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचा वाचनाचा समारोप कार्यक्रम भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन भंते पयादीप यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले ग्रंथ वाचन करणारे गोविंद कांबळे यांचा वस्तूरुपी भेट देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी शिवाजी कदम मारुती हनवते भारतीय बौद्ध महासभा व महिला मंडळ यांच्या वतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी प्रताप रोकडे बाबासाहेब मुनेश्वर भालचंद्र पोपलवार गोविंद कांबळे शिवाजी कदम ,मारुती हानवते,काशिनाथ पोपुलवार ,उमरे ताई भालेराव, भरणे यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.