राष्ट्रीय महामार्गावर सरसम नाल्याजवळ ट्रॅक्टरची कृझर गाडीला‌ जोराची धडक/ शिवणी येथील एकजण ठार

हिमायतनगर प्रतिनिधी/ भरधाव वेगातील एका रेतीच्या ट्रॅक्टरने कुझरला जबर धडक देऊन कुझर चालकाचा बळी घेतला आहे. हि दुर्घटना दिनांक २३ च्या रात्री १०.३० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील सरसम आबादी ते मसोबा नाल्याच्या मधील महादेव मंदिराच्या आसपास घडली आहे. या घटनेनंतर ट्रॅक्टर मालकाने हेड जाग्यावर ठेऊन नंबर असलेली ट्रॉली पळवून नेली आहे. तालुक्यात रात्रीला चोरीच्या पद्धतीने रेतीची वाहतूक करतांना भरधाव वेगाने वाहने चालविली जात आहेत. त्यामुळे रस्त्याने प्रवास करणाऱ्यां वाहनधारकात भीती निर्माण झाली आहे. या घटनेत किनवट तालुक्यातील शिवणी येथील कृझर गाडीच्या ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


हिमायतनगर तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या काठावरून 
बुधवार दिनांक 23 आक्टोबर च्या रात्रीला घारापुर येथील दोन ट्रॅक्टर चालक मालकाने सरसमच्या पुढील गावाकडे रेती रिकामी करून दुसरी खेप नेण्यासाठी भरधाव वेगात वाहन चालवत येत होते. याच वेळी हिमायतनगर कडून नांदेडकडे भाडे असल्याने कुझर गाडी चालक दीपक दामोदर कटकेमोड रा शिवणी वय 35 वर्ष हे जात होते. सरसम अबादीच्या अलीकडे क्रुझर गाडी आली असता समोरून भरधाव वेगात पुन्हा रेती घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या दोनपैकी एका ट्रॅक्टरने क्रुझरला समोरासमोर जबर धडक दिली. ही घटना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सरसम आबादी जवळील महादेव मंदिराच्या आसपास घडली आहे. या घटनेत कुझर चालकाचा शीर धडा वेगळे होऊन जागीच मृत्यू झाला आहे. हा प्रकार लक्षात येताच ट्रॅक्टर चालक मालकाने ट्रॅक्टरचे हेड जाग्यावर ठेऊन ट्रॉली लांबविली आहे.हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रेताचे श्वेच्छदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले मयत हा किनवट तालुक्यातील शिवणी येथील रहिवासी असुन पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण,एक मुलगा असा परिवार आहे.त्याच्यावर दुपारी 3 वाजता शिवणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. या घटनेने मयताचे नातेवाईकांनी रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर चालक मालकावर हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. 
याबाबत जमादार कदम यांनी सांगितले कि, रेतीच्या ट्रॅक्टरने ट्रॉली धडक दिल्याने हि घटना रात्रीला घडली असून, नातेवाईकांच्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालक मालकावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.

      

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.