हिमायतनगर प्रतिनिधी/हिमायतनगर तालुक्यातील कारला (पी) येथे २५ डिसेंबर रोजी देवकाबाई धर्माजी घोडगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या विशेष उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंताचा गौरव, आई या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमास ऊपस्थीत रहाण्याचे आवाहन घोडगे परीवारानी केले आहे.
या कार्यक्रमास कृषी विद्यापीठ परभणी चे प्रोफेसर प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ चे प्रोफेसर डॉ भास्कर दवणे यांच्या सह मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास आई या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून मुखेडचे प्रा डॉ रामकृष्ण बदने यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य ज्ञानेश्वर घोडगे, मंत्रालयातील कक्ष अधिकारी प्रसेनजित घोडगे, ग्रा. प सदस्या सौ कल्पना घोडगे, अँड स्वाती कारलेकर, अभिजीत कारलेकर, डॉ निकिता कारलेकर यांच्या सह सरपंच, ऊपसरपच, ग्रा प सदस्यांनी केले आहे.
