हिमायतनगर प्रतिनिधी/तालुक्यातील सवना ज. , रमनवाडी, जिरोना, महादापूर, दगडवाडी, चिंचोर्डी, गणेशवाडी, गणेश वाडी तांडा, पिचोंडी, एकघरी, पार्डी, वाशी या भागात सुप्रसिद्ध असलेल्या पाचशिव महादेव ( पार्श्वनाथ ) देवाच्या यात्रा महोत्सवाची सुरुवात १ जानेवारी पासून होणार आहे. या यात्रा महोत्सवात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, या स्पर्धेत विजयी गटास मोठ्याप्रमाणात बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे.
एक जानेवारी सोमवार ला सकाळी साडेनऊ वाजता कांतागुरू वाळके व इतर यांच्या हस्ते महादेवाचा अभिषेक आणी त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. हा यात्रा महोत्सव ५ तारखेपर्यंत चालणार असून या महोत्सवात १ जानेवारी ला लेझीम स्पर्धा, ता. २ मंगळवार व्हॉलीबॉल स्पर्धा, व तसेच शालेय खोखो सर्धा मुले व मुली ह्या वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. २ ला च भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न होणार आहे. दि. ३ ला शंकर पट , व ता. ५ ला भव्य कुस्त्यांची दंगल होणार आहे. या सर्व स्पर्धेत विजय संपादन केलेल्या खेळाडूंना मान्यवर मंडळीच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. या भव्य यात्रा महोत्सवाचा यात्रेकरूंनी मोठ्याप्रमाणात लाभ घ्यावा. असे अवाहन संस्थानचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, उपाध्यक्ष कामनराव वानखेडे, सचिव गणेशराव भुसावळे, नागोराव बुरकूले, गोविंद काळे, सत्यवृत ढोले, प्रकाश जाधव, गुणाजी आडे वामनराव जाधव आदिंनी केले आहे.
