हिमायतनगर प्रतिनिधी/ पाचशिव महादेव ( पार्श्वनाथ ) देवाच्या यात्रा महोत्सवाची सुरुवात १ जानेवारी पासून झाली असून यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी महादेवाचा अभिषेक करण्यात आला दिवसभर यात्रेत पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती.पहिल्या दिवशी लेझीम स्पर्धा संपन्न झाली महादापुर येथील आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
पाचशिव महादेव ( पार्श्वनाथ) यात्रा महोत्सवात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, या स्पर्धेत विजयी गटास मोठ्याप्रमाणात बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी सोमवारी सकाळ पासून भरगच्च भाविकांनी गर्दी केली. महादेव दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. दुपारी भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला आहे. त्यानंतर लेझीम स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला आयोजित करण्यात आली होती. या लेझीम स्पर्धेत तिन शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अतिशय सुंदर देखनी तयार विद्यार्थ्यांनी केली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक जिरोणा येथील आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकावला आहे तर द्वितीय क्रमांक भिसी येथील जिल्हा परिषद शाळेनी पटकावला, तृतीय क्रमांक सवना येथील जि प के प्रा शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकावला आहे. एकघरी येथील सिध्दीविनायक भजनी मंडळाच्या संचाच्या गायण वादनाने दिवसभर भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. लेझीम स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना यात्रा कमिटी अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, शिवगीर महाराज, आनंता बोलसटवार, बळवंत जाधव,गणेश जाधव, रविनाथ जाधव, अनिल आडे, संतोष अनगुलवार, विठ्ठल बुरकुले, यांच्यासह बक्षीस दाते, महादापूर येथील का.शेषेराव चांदराव राऊत आश्रम शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक जि. एम. वानखेडे, प्राथमिक मु. अ. लोहकरे, संकुरवार, शिंदे, पि. डी. भैरेवाड शिक्षक, यात्रा कमिटी सदस्य भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा यात्रा महोत्सव ५ तारखेपर्यंत चालणार असून भाविकांनी यात्रेतील स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी केले आहे
