स्व. पंजाबराव पाटील यांनी समाजासाठी पाहिलेली स्वप्न पूर्ण करणार- आ. जवळगावकर

हिमायतनगर प्रतिनिधी/ स्वर्गीय पंजाबराव पाटील जवळगावकरांचे समाजातील वंचितांची कामे करून गोरगरिबांना न्याय देण्यासाठीचे प्रयत्न असायचे. त्यांचे कार्य आणि विचार सदैव प्रेरणा देतात त्यांच्या कार्याचा वारसा कायम ठेवून त्यांनी समाजासाठी पाहिलेली स्वप्न आपण पूर्ण करणार असल्याची भावना आ. जवळगावकर यांनी बोलतांना व्यक्त केली. 
 जवळगाव येथे दि. 20 डिसेंबर रोजी स्वर्गीय पंजाबराव पाटील जवळगावकर यांच्या पुण्यस्मरणानिमीत्त पंजाबराव पाटील जवळगावकर यांच्या प्रतिमेचे पुजन आ. माधवराव पाटील जवळगावकर, मातोश्री शांताबाई पाटील जवळगावकर व पवार परिवारासह हदगाव हिमायतनगर तालुक्यातील कांग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी समाधीस्थळी अभिवादन केले. 

या पुण्यस्मरणानिमीत्त बोलतांना आ. माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले की बंधू स्व. पंजाबराव पाटील यांनी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील जनतेच्या कल्याणासाठी आयुष्यभर कष्ट केले. त्यांचा लोकसेवेचा वारसा त्यांनी समाजासाठी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडील माजी आमदार कै निवृतीराव पवार,दादा कै पंजाबराव पाटील यांनी आपल्या आयुष्यात सामान्यांसाठी जीवन समर्पित केले होते.त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आई सह आपल्या आशिर्वादाने काम करण्यासाठी आजपर्यंत कमी पडलो नाही.भविष्यात देखील कमी पडणार नाही. ईश्वराच्या कृपेने सावरल्यामुळे जनतेच्या सार्वजनिक कामासाठी आणि वैचारिक कामासाठी मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा संकल्प असल्याचे सांगितले. दादांचे विकास रुपी स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठेही कमी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी कॉग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष आनंदराव भंडारे, तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी , किशोर पाटील कदम , माजी जिल्हा परिषद सदस्य के.सी.सुर्यवशी, शामराव पाटील, कैलास माने, शेख रफिकभाई,सभापती 
जनार्दन ताडेवाड, ज्ञानेश्वर शिंदे, संजय माने,योगेश चिलकावार ,जोगेंद्र नरवाडे, परमेश्वर गोपतवाड, डॉ . राजेंद्र वानखेडे ,नितेश जैस्वाल,शिवप्रसाद सुर्यवंशी , गणेशराव शिंदे, भुजंगराव देवसरकर, संतोष पाटील, आत्माराम पाटील , सरपंच साईनाथ पाटील सुर्यवंशी , राजीव पाटील जाधव, गणेश देवराये, संतोष अंबेकर, संदिप काळबांडे, 
तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदेश पोहरे,नागमवाड, श्नीदत पवार, सुनील वानखेडे, ऊपसरपच सुभाष माने, सरपंच दत्तात्रय पवार, गोविंद बंडेवार, अ. बाकी,आशोक अनगुलवार,प्रविण कोमावार, यांच्या सह जवळगाव आणि परीसरातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.               

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.