आपले सवना ज गाव चांगले असुन ग्रामपंचायतच्या वतीने होणारी कामे सरपंच, ऊपसरपच, ग्रा. प.सदस्य, युवकासह ज्येष्ठांच्या सहकार्याने गटविकास अधिकारी सुधीश मांजरमकर,प.स.विस्तार अधिकारी सुशीलकुमार शिंदे, प्रमोद टारफे यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक पणे करणार असल्याची ग्वाही नव्यानं रुजू झालेले ग्रामसेवक के.डी.सुर्यवशी यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. सवना ज येथे गेल्या काही महिन्यांपासून ग्रामसेवक नियमित नसल्याने अडचण येत होती.आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या पर्यंत हा प्रश्न गेल्यावर त्यानी गटविकास अधिकारी सुधीश मांजरमकर यांना सवना ज गावी तात्काळ ग्रामसेवक देण्याची सुचना केली होती.प.स.चे विस्तार अधिकारी सुशीलकुमार शिंदे, प्रमोद टारफे यांनी याकामी विशेष लक्ष घातल्याने १३ डिसेंबर रोजी ग्रामसेवक के डी सुर्यवंशी हे सवना ज येथे रुजू झाले.प्रथम आगमन प्रसंगी सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांच्या ऊपस्थीत ऊपसरपच प्रतिनिधी सोनबा राऊत, सोसायटी चे जेष्ठ संचालक, सेवा निवृत्त मुख्याध्यापक माधवराव बिरकलवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहाराने स्वागत करण्यात आले.यावेळी पुढे बोलताना सुर्यवंशी म्हणाले की, सवना ज गांवकरी बांधवांनी केलेल्या सत्कार प्रेरणादायी ठरणार आहे.शासनाच्य आदेशानुसार गावातील कामे करताना पारदर्शक पणे कामे होतील.आपल्या सर्वांच्या सहकार्याने कामे करत गावांला वैभवाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सदैव तयार असल्याचे सांगितले.अध्यक्षीय समारोप करताना एम जे बिरकलवार म्हणाले की, सवना ज हे गाव चळवळींचे असुन येथील नागरीक सामंजस्य पणे वागणारे व्यक्तीमत्व आहेत.गावकरी बांधवांचा समन्वय ठेवून सरपंच, ऊपसरपच ग्रा. प.सदस्याना विश्वासात घेऊन कामे करावी असे म्हटले.याप्रसगी सरपंच परमेश्वर गोपतवाड,ग्रा प सदस्य संदिप बिरकलवार, सिध्दार्थ राऊत, संजय राऊत, गजानन गोपेवाड, मारोतीराव पाटील आक्कलवाड, नंदकुमार राऊत, सोसायटी चे संचालक गणेशराव भुसाळे,सोनबा अनगुलवार, माजी चेअरमन साहेबराव बिरकलवार, परमेश्वर संगनवाड, बाबुराव ढाले, आनंदराव बोलसटवार, दिगंबर अनगुलवार,भारत गुंडेकर, गोविंद गोपेवाड, मुरलीधर अनगुलवार, बुध्देवाड, संकष्टवार, विनायक शिंदे, तानाजी यलसटवार,किरण धबडगे यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती. . ....चौकट.आ जवळगावकराच्या मार्गदर्शनाखाली गावचा विकासात्मक चेहरा बदलल्याचे चित्र दिसणार... गोपतवाड. सवना ज गावाला पंधराव्या वित आयोगाची कामे शासनाच्या निधी नुसार सुरू आहेत.सवना रमणवाडी,बाराळी तांडा, नवीन पाणी पुरवठयाची नळयोजना, पाण्याची एक टॉकि आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नातून मंजुर झाले आहेत.शाळा दुरुस्ती, प्राथमिक ऊप आरोग्य केंद्रांच्या पटांगणातील पेव्हर ब्लॉक, दलित वस्तीत पेव्हर ब्लॉक ची कामे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या माध्यमातून झाली आहेत. बौद्ध विहार ते हनुमान मंदीर डांबरीकरण रस्त्याच्या कामांना निधी आणण्याचे आ.जवळगावकर यांचे प्रयत्न चालू आहेत.कोणी निंदा कोणी वंदा विकास कामे करणे आपले कर्तव्य समजून आ.जवळगावकर कामे करीत असल्यामुळे गावांचा विकासात्मक चेहरा बदलल्याचे चित्र काही महिन्यांत पूर्ण होतील असे सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड म्हणाले.
आपल्या सर्वांच्या सहकार्याने सवना ज गावचे काम पारदर्शक पणे करणार;- ुर्यवंशी
0
December 14, 2023
