हिमायतनगर प्रतिनिधी/ शहरातील बाजार चौक येथील श्री हनुमान मंदिरात शुक्रवारी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
हिमायतनगर शहरातील बाजार चौक येथील श्री हनुमान मंदिर येथे शुक्रवारी गणेश मूर्ती स्थापना अभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी 9 ते 11 मुर्ती स्थापना पुजा आरती करण्यात येणार आहे. तदनंतर दुपारी 12 नंतर महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. या गणेश मूर्ती स्थापना व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री हनुमान मंदिर कमिटी च्या वतीने करण्यात आले आहे.
