हिमायतनगर तालुक्यातील विरसणी येथे लहरीबाबा संस्थान महादेव मंदिर प्रांगणात पवित्र श्रावणमासा निमित्ताने विरसणी येथे संगितयम भव्य शिवपुराण कथा महायज्ञ सोहळा , पार्थिव शिवलिंग निर्माण व भव्य पंचकुटी महारुद्र यज्ञ सोहळा दि. 28 आगस्ट पासून सुरू करण्यात आला असून 4 सप्टेंबर पर्यंत
कथा प्रवक्ते प.पू.बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या रसाळ वाणीतून सुरू राहणार आहे.
या श्री शिव महापुराण कथा श्रवणासाठी रोजच भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. भक्तीचा मधूर नाद, चंदनाचा सुगंध दरवळावा अशा भक्तीमय वातावरणात विरसणी गाव महाकालमय झाले आहे. सुरू असलेल्या या संगितयम भव्य शिवपुराण कथा महायज्ञ सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विरसणी ग्रामस्थांनी केले आहे.
