हिमायतनगर प्रतिनिधी/ कारला पिचोंडी येथे आजपर्यंत ग्रामपंचायत ईमारत उभारण्यात आली नाही त्यामळे नागरीकांना विविध योजनांची माहिती मिळत नाही ईमारत बांधकामाचा प्रश्नासह उर्वरित गावातील रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले.
हिमायतनगर कारला पिचोंडी गट ग्रामपंचायत असून शासनाने अद्यापही ग्रामपंचायत ईमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. याबाबत सरपंच, सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्यासह गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले होते परंतु आजही इमारतीचा प्रश्न प्रलंबित आहे.
मंगळवारी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी कारला गावाला भेट दिली असता गावातील उर्वरित रस्त्याची पाहणी ,अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी
केली, असता जवळगावकर म्हणाले की ग्रामपंचायत च्या कार्यकाळात कारला फाटा ते गावापर्यंत च्या मुख्य रस्त्याचा प्रश्न सुटला आहे.
पादंन रस्त्याचे काम सुरू झाले, सिमेंट रस्ता देखील झालेला आहे. यासह ग्रामपंचायत च्या ईमारत आणी सिमेंट रस्ते राहिले ती लवकरच मंजुरी करून देणार असल्याचे सांगितले आहे.ग्रामपंचायत ईमारत बांधकामाबाबत जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना केल्या आहेत.
उर्वरित कामे देखील पुर्ण करून या ग्रामपंचायत कार्यकाळात गाव विकासापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही आ. जवळगावकर यांनी दिली आहे यावेळी सभापती जनार्दन ताडेवाड, गजानन सुर्यवंशी, सरपंच गजानन कदम, डॉ. गफार, अ. रज्जाकभाई,
सोपान बोंपीलवार,रामेश्वर यमजलवाड,गजानन मिराशे, मारोती ढाणके,नागोराव गोणेवाड,तुकाराम कदम,जांबुवंत मिराशे, गौतम नरवाडे,रामराव पाटील, यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
