हिमायतनगर प्रतिनिधी/ मराठा आरक्षणासाठी उपोषणात बसलेल्या उपोषणकर्त्यावर जालना येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी हिमायतनगर शहर कडकडीत बंद पाळण्यात येऊन सदर घटनेचा निषेध करण्यात आला या आंदोलनात मराठा समाजाला आरक्षण नाहीतर येणाऱ्या निवडणुकात मराठ्यांचे मतदान होणार नाही असा इशारा या आंदोलनातून सरकारला देण्यात आला आहे.
हिमायतनगर शहरात दि. 4 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेपासून परमेश्वर मंदिर समोरील मुख्य रस्त्यावर सकल मराठा समाजाच्या आंदोलनास सुरूवात करण्यात आली. या ठिकाणी जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषणात बसलेल्या उपोषणकर्त्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेध केला.सदरील घटनेला सरकार जबाबदार असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आजपर्यंत मराठा समाजातील नेत्यांनी केवळ मराठा समाजाचा मतासांठी वापर केला असुन समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला नाही त्यामुळे त्या मराठा समाजातील नेत्यावर रोष व्यक्त केला आहे. या आंदोलन स्थळी अनेकांनी आरक्षणा संदर्भात आपली भुमिका मांडली समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरू राहणार असल्याचे सांगितले. आंदोलकांनी परमेश्वर मंदिरा पासून शहरातून मोर्चा काढला मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, एक मराठा लाख मराठा, या सरकारचा जाहीर निषेध, जालना घटनेत सहभागी असणाऱ्यांचा निषेधाच्या घोषणा देत चौपाटी मार्गे मोर्चा कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता काढण्यात आला. सदरील मराठा समाजाच्या मागण्याचे निवेदन देऊन सांगता करण्यात आली. या आंदोलनात पोलीस बंदोबस्त होता . अतिशय शांततेत मोर्चा काढण्यात आला शहरातील व्यापारी बांधवांनी दुकाने बंद ठेवून पाठींबा दर्शविला होता. या आंदोलनात सकल मराठा समाजातील विविध पक्षाचे, संघटनेचे,पदाधिकारी, डॉक्टर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
