बीएलओ व पर्यवेक्षक यांनी घरोघरी जाऊन मतदार नाव नोदणी करून घावी – जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत

हिमायतनगर प्रतिनिधी/ आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने नवीन मतदार नोंदणी व दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कामात सर्वानी घरोघरी जाऊन मतदार नाव नोदणी करून घावी. जेणेकरून मतदार याद्यांचे काम पारदर्शकता पूर्वक होतील. अश्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांनी केल्या.

 हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय सभागृहात दि.१८ रोजी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत, उपविभागीय अधिकारी अरुण संगेवार, तहसीलदार आदिनाथ शेंडे, हादगावचे तहसीलदार विनोद गुंडमवार, गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड, नायब तहसीलदार ताडेवाड, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी, केंद्रस्तरीय पर्यवेक्षक व बीएलओ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.