किरीट सोमय्या च्या पुतळ्यास शिवसैनिकांचे जोडे मारो आंदोलन...

हिमायतनगर प्रतिनिधी/- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज दि 18 जुलै रोजी श्री परमेश्वर मंदिर समोर किरीट सोमय्यां यांनी सोशल मीडियावर एक अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे त्या विरोधात भर पाऊसात भिजत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून किरीट सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा पुतळ्याला जोडे मारत आंदोलन केले

 या बाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 18 जुलै रोजी हिमायतनगर येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी भर पाऊसाच्या पाण्यात भाजपा चे माजी खासदार किरीट सोमय्यां यांनी एक सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करत सोमय्यां यांनी आपली गैर वर्तणूक लपवून ठेवत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ऊठसूट टीका करणाऱ्या सोमय्या यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत सोमय्या यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले यावेळी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे, शिवसेना उपतालुकाप्रमुख विलास वानखेडे ,तालुका संघटक संजय काईतवाड, युवा सेना तालुकाप्रमुख योगेश पवार सोनारीकर,युवा सेना तालुका संघटक संतोष पुलेवार, प्रदीप नरहरे , विशाल आल्लवार पोटेकर सह आदी शिवसैनिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.