आपला दवाखान्याची सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहचवली पाहिजे- आ. जवळगावकर

हिमायतनगर प्रतिनिधी/ आपला दवाखान्याची सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहचवली पाहिजे आणि तळागाळातील रुग्णांना आरोग्य विभागाच्या वतीने मोफत सेवेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी आरोग्य विभागाची जागृता महत्त्वाची असल्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी व्यक्त केले आहे. 
      हिमायतनगर शहरात नव्याने सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने हिंदू ह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे उदघाटन महाराष्ट्र दिनी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले . या आपला दवाखाना उदघाटन प्रसंगी बोलतांना आ. जवळगावकर म्हणाले ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना या दवाखान्यातून तात्काळ सेवा मिळाली पाहिजे रुग्णांना लागणाऱ्या सोई सुविधा याठिकाणी आरोग्य विभागाने उपलब्ध करून घ्याव्यात आणि रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा द्यावे असे आवाहन केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी संदेश पोहरे,बालविकास प्रकल्प अधिकारी मुदखेडे, संचालक गणेश शिंदे, शेख रफिकभाई,अ. आखील, जनार्दन ताडेवाड, गजानन सुर्यवंशी, सुभाष शिंदे, योगेश चिलकावार ,डॉ.वैभव नखाते, डॉ. अनील पोपूलवार,राजू नागमवाड, अफरोज सौदागर, कृष्णा चौधरी, सचिन देशमूख,सूनील चव्हाण,सूरेश बादेवाड, डॉ.सूवर्णा परभनकर, कू.प्रतिक्षा घोरबंड, श्रीमती वर्षा मेटकर, डॉ.किरण भाले, डॉ.बालाजी मिजगर, डॉ.गोविंद वानखेडे, डॉ.प्रेम वाघमारे, साईनाथ श्री.शाम अनरवाड, व आरोग्य कर्मचारी उपस्थीत होते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.अफरोज सौदागर यांनी केले 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.