हिमायतनगर प्रतिनिधी/ सिरपली गावातील अंगणवाडी कार्यालय ग्रामपंचायत कडून दोन महिन्यापुर्वी दुरुस्ती करण्यात आली होती परंतु सदरील काम थातूरमातूर केल्यामुळे झालेल्या अवकाळी पावसात गळू लागली असुन अंगणवाडी च्या चिमुकल्यांचा खाऊ देखील पाण्यात भिजल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील सिरपली गावातील अंगणवाडी कार्यालयाची दोन महिन्यापुर्वी दुरुस्ती केली होती. झालेल्या अवकाळी पावसामुळे अंगणवाडी पुर्णपणे गळू लागली आणि पाणी देखील साचून होते. महाराष्ट्र दिनानिमित्त पालकांनी भेट दिली अंगणवाडी ला भेट दिली असता सदरील प्रकार पालकांच्या लक्षात आला. ग्रामपंचायत सदस्य दत्ता ढवळे यांनी अंगणवाडीला भेट देऊन परिस्थिती पाहणी केली असता विद्यार्थ्यांचा खाऊ देखील पाण्यात भिजत होता.
सदरील अंगणवाडी दुरुस्तीचे काम सरपंच- ग्रामसेवकांनी थातूरमातूर केले असल्याने अंगणवाडी च्या बालकांची हि अवस्था झाली असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य दत्ता ढवळे, शालेय समिती अध्यक्ष संतोष जाधव यांनी केला आहे. सदरील अंगणवाडी तात्काळ दुरूस्ती करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत गटविकास अधिकारी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.
