हिमायतनगर प्रतिनिधी/ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या अधिपत्याखाली, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड यांच्या सह काँग्रेस चे जेष्ठ मंडळी, तरुण,युवा कार्यकर्त्यांच्या परीश्नमामुळे काँग्रेसच्या १८ ही जागेवर घवघवीत यश मिळाले आहे.त्यात संचालक म्हणून तालुक्यातील सवना ज येथील सरपंच, चेअरमन, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांची कृषी उत्पन्न बाजार समिती वर संचालक म्हणून निवड झाल्यामुळे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांचे आभार मानत गावकऱ्यांनी गोपतवाड यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सोसायटी चे संचालक गणपत राऊत, विजय राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी बोलताना परमेश्वर गोपतवाड म्हणाले की सवना गावकऱ्यांच्या आशिर्वादामुळेच आजपर्यंत गळ्यात विजयाची माळ पडत आहे. माझ्यावर जिवापाड प्रेम करणारे माझे ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्यामुळेच अनेक पदावर संधी मिळाली त्यांचे उपकार कदापि विसरणे शक्य नाही असेही गोपतवाड म्हणाले यावेळी ऊपसरपंच सोनबा राऊत, संचालक दिलीप अनगुलवार सवनेकर, गणेशराव भुसाळे , नंदकुमार राऊत, तंटामुक्त गाव समिती चे अध्यक्ष कैलास अनगुलवार, संजय राऊत, सिध्दार्थ राऊत, सुनील गुंडेकर,ग्रा.प.सदस्या सौ.रमाबाई राऊत, श्नीमती सुलोचना राऊत, संदिप बिरकलवार, लक्ष्मण राऊत, बन्टी राऊत, गजानन दर्शनवाड, संतोष संभाजी अनगुलवार, विनायक शिंदे पाटील, माधवराव अनगुलवार, गणेश बिरकलवार, दिनेश बिरकलवार, पंजाबराव भुसाळे, मारोतराव पाटील आक्कलवाड, बाळासाहेब संगनवाड, अनिल आहिरवाड,बाळाभाऊ विठलवाड, दिगंबर अनगुलवार,रोहन जाधव, प्रकाश अनगुलवार, राजीव राऊत, शालेय समितीचे अध्यक्ष सोनबा अनगुलवार,रविभाऊ तिव्हाळे, शिवाजी अनगुलवार यांच्या सह अनेकांची उपस्थिती
होती.
....चौकट....
नवनिर्वाचित संचालकांचा आप आपल्या गावी सत्कार...
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांचा त्या त्या गावी गावकऱ्यांनी शाल, श्नीफळ देऊन सत्कार करुन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या कर्तबगारी मुळे आमच्या गावाला तालुका पातळीवर नेत्रत्व करण्याची संधी दिल्याबद्दल १८ ही गावातुन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांचे त्रुण व्यक्त केले आहे
