हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर कांग्रेस पक्षाचा 18 पैकी 18 जागेवर दणदणीत विजय... या विजयाचे वाटेकरी माझे कार्यकर्ते आ. जवळगावकर

हिमायतनगर प्रतिनिधी/ येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा शनिवारी निकाल घोषित झाला असून या निवडणुकीच्या निकालात कांग्रेस पक्षाच्या पॅनालचा 18 पैकी 18 जागेवर दणदणीत विजय झाला असून आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता मिळाली आहे.   हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले होते तर शनिवारी दुपारी या निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. तिरंगी लढत झालेल्या निवडणुकीत कांग्रेस पक्षाच्या उमेदवार मताधिक्याने विजयी झाले आहेत. सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून सर्वसाधारण मधून जनार्दन ताडेवाड,प्रकाश वानखेडे, संजय सुर्यवंशी, दत्ता कोंकेवाड, राजेश चिकनेपवाड, खंडू टेकाळे, कृष्णा राठोड, विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून शाम गड्डमवाड, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून सुभाष शिंदे, महिला मतदारसंघातून शिलाबाई वानखेडे, कांताबाई सुर्यवंशी, हे आकरा उमेदवार सेवा सहकारी संस्था सोसायटी मतदारसंघातून विजयी झाले ग्रामपंचायत मतदारसंघातून सर्वसाधारमधून परमेश्वर गोपतवाड, रामराव कदम, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून दादाराव भिसे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघातून धर्मराज शिरफुले, अडत व्यापारी मतदारसंघातून संदीप पळशीकर, स. रऊफ. स. गफूर, हमाल व मापाडी मतदारसंघातून शे. मासुम शे. हैदर, असे एकूण कांग्रेस पक्षाच्या पॅनालच्या 18 पैकी 18 उमेदवारांचा मताधिक्याने विजय झाला आहे . झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत तिरंगी लढत झाली आहे. 18 जागेसाठी 52 उमेदवार रिंगणात उतरले होते.राष्ट्रीय कांग्रेस पक्षाने आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणुक लढविली आहे तर उद्धव ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, यांनी युती केली होती. भारतीय जनता पार्टी, शिंदे गट यांनी आपले उमेदवार उभे करून ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी या निवडणुकीची तयारी अतिशय नियोजनबद्ध केली होती कार्यकर्त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले . या निवडणुकीत कांग्रेस पक्षाच्या पॅनालच्या उमेदवारांना शिवसेना पक्ष युतीच्या नेत्यांनी शह देण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांचा प्रयत्न असफल ठरला आहे. विजयी झालेल्या उमेदवारांचे आ. माधवराव पाटील जवळगावकर अभिनंदन कौतुक केले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, शेख रफिकभाई,अ.आखील,कैलास माने, गणेश शिंदे,समद खान, गजानन सुर्यवंशी,संजय माने,ज्ञानेश्वर शिंदे,प्रल्हाद पाटील, बाळा पाटील, योगेश चिलकावार, बाकी भाई, सोपान बोंपीलवार, श्रीदत्त पाटील,डाॅ.गफार,रोशन धनवे, चंद्रकांत घोडगे, संतोष आंबेकर, दता पुपलवाड, यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन संचालक मंडळ कांग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 *ऐतिहासिक विजयाचे वाटेकरी कार्यकर्ते...* आ. जवळगावकर
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत एकत्र ऐऊन कांग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनतीने नियोजन करून संपुर्ण जागेवर कांग्रेस पक्षाचा झेंडा फडकवला या विजयाचे श्रेय माझ्या कार्यकर्त्यांना असल्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.