हिमायतनगर तालुक्यातील वारंगटाकळी येथे हनुमान मंदिराच्या अखंड हरिनाम स्पताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते.श्रीमद भागवत कथा व्यासपीठ ह.भ.प.हरिभाऊ राठोड यांच्या मंजूळ वाणीतून संपन्न झाली. या सप्ताहाची समाप्ति शुक्रवारी ह.भ.प.भिमराव महाराज सुर्यवंशी फुटाणकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. या किर्तन सोहळ्यात ह. भ. प. फुटाणकर महाराज म्हणाले की जिवनात संपत्ती पेक्षा संतती महत्त्वाची असुन जिवनात आपल्या मुला बाळांना संस्कार दिले तर तिच जीवनाची खरी संपत्ती असेल म्हणून आज प्रत्येक आई वडिलांनी आपली संतती टिकून त्यांना आपली संस्कृती , आपला धर्माचे कार्य शिकवले पाहिजे त्यांच्या हातून समाजाची राष्ट्राची सेवा घडली पाहिजे तरच खरी संपत्ती उदयास ऐणार आहे म्हणून आपण संपत्ती पेक्षा संततीला महत्त्व दिले तर समाज देखील सुधारेल म्हणून संताचे विचार आत्मसात करून गावोगावी अखंड हरिनाम स्पताह भागवत कथा करावा तेंव्हा परमार्थ घडतो यामुळे आपला गाव आपला समाज संत संगतीत आल्याशिवाय राहणार नाहीत असे फुटाणकर महाराज म्हणाले या किर्तन सोहळ्यात पखवाज वादनाची साथ राम महाराज आकमवाड, ज्ञानेश्वर महाराज,गायणाचार्य साहेबराव महाराज, दिगंबर महाराज, पोलीस पाटील अवधूत कदम, सरपंच दयाळगिर गिरी, दता पुपलवाड, जयवंत जोगंदड,पांडुरंग आडे, मारोती पुपलवाड, आनंद रुद्रबोईनवाड, सुभाष सुर्यवंशी, विश्वाभंर राणे,रमेश जोगंदड,अवदूत हाके,केशव कदम,देवराव सुकळकर,रामेश्वर अंबेपवाड यांच्यासह वारंगटाकळी येथील भजनी मंडळ व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
सुखी जीवनासाठी व्यसनापासून दुर झाले पाहिजे... ह. भ. प. भिमराव महाराज फुटाणकर
0
May 05, 2023
 हिमायतनगर प्रतिनिधी/ संसाररुपी जिवन जगतांना प्रत्येक माणूस व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊ लागला आहे परंतु घरातील कुटुंबातील माणसाला लागलेल्या व्यसनाधीनतेमुळे अनेक संसार उध्वस्त होत आहेत. त्यामुळे प्रत्येकांनी सुखी जीवनासाठी कुटुंबातील व्यक्तींना आनंदी ठेवण्यासाठी व्यसनापासून दुर राहिले पाहिजे असे ह. भ. प. सुर्यवंशी महाराज फुटाणकर यांनी केले आहे.
