सिबदरा येथील दोघा दुचाकीस्वाराची उभ्या टम्पोला धडक -अपघातातील दोघेही ठार..शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

हिमायतनगर प्रतिनिधी/  हिमायतनगर शहरातून बाजार करून सोमवारी सायंकाळी गावाकडे निघालेल्या सिबदरा (ज.) येथील दोघांचा दुचाकी टेम्पोला धडकून मोठा आपघात घडला या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दुसरा दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. 
     हिमायतनगर तालुक्यातील सिबदरा (ज.) येथील गोपाळ माधव बाचकलवाड वय(42) , आणि देविदास बालाजी  गोसलवाड वय(27) हे दुचाकीवरून हिमायतनगरहून सिबदरा गावाकडे निघाले होते. त्यांची दुचाकी वडगाव गावाजवळील मुख्य रस्त्यावर असलेल्या हनुमान मंदिराजवळ आली असता सदर दुचाकी उभ्या असलेल्या पिकअप टेम्पोवर धडकल्याने सदर अपघात घडला. या घटनेत गोपाळ बाचकलवाड यांचा मृत्यू झाला तर देविदास गोसलवाड यांना जखमी अवस्थेत नांदेड येथे रूग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेल्यानंतर मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.यातील गोपाळ बाचकलवाड यांच्या पश्चात  पत्नी, एक मुलगा, मुलगी, आई  असा परिवार आहे यांचा अंत्यविधी सकाळी करण्यात आला आहे. तर देविदास गोसलवाड यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा  ,आई  असा परिवार आहे. अपघातातील मयत दोघांवरही दि. 9 मे रोजी दुपारी  सिबदरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या अपघाती निधनाने दोघांच्याही कुटुंबियासह ग्रामस्थांवर दुःखांचा डोंगर कोसळल्याने हळहळ व्यक्त केली आहे. अंत्यविधीसाठी समाज बांधवासह नातेवाईक, विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.