हिमायतनगर प्रतिनिधी/ शनिवार पवित्र रमजान ईद च्या निमित्ताने शहरातील मुस्लिम बांधवानी सकाळी ईदगाह मैदानावर नमाज आदा करून एकमेकांना भेटून ईद उत्साहाने साजरी केली आहे.
रमजान ईद निमित्ताने मुस्लिम बांधवाना नमाज पडण्यासाठी हिमायतनगर शहरातील ईदगाह मैदानावर नगरपंचायत प्रशासनाकडून ईदच्या पहिल्या दिवशी व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील गेल्या काही वर्षांपासून हिंदू मुस्लिम बांधवाच्या एकतेची परंपरा ईद च्या निमित्ताने आजही सूरु आहे. रमजान निमित्ताने नमाज आदा झाल्यानंतर परमेश्वर मंदिर ट्रस्ट कडून सर्व मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देण्यासाठी बाजार चौक परिसरात आयोजन करण्यात आले होते.या ठिकाणी शहरातील हिंदू समाजातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहून मुस्लिम बांधवाना भेटी देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवाना रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या आहेत.शहरातील हिंदू मुस्लिम बांधवाच्या एकतेची परंपरा आजही कायम दिसून आली आहे. ईदगाह मैदानावर पोलीस निरीक्षक बि. डी. भुसनूर, यांच्यासह पोलीस बांधव उपस्थित होते.
