हिमायतनगर प्रतिनिधी/ शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी शंकर पळशीकर यांच्या पत्नी प्रभावती पळशीकर यांचे रविवारी वृद्धापकाळाने दुख द निधन झाले. निधनाची माहिती मिळताच आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी पळशीकर यांच्या घरी भेट देऊन परिवाराचे सांत्वन केले.
आ. जवळगावकर यांनी शासकीय कंत्राटदार सुरेश पळशीकर,कृषी व्यापारी रमेश पळशीकर, माजी संचालक संदीप पळशीकर,संतोष पळशीकर यांना भेटून धिर दिला यावेळी सुभाष राठोड, शेख रफिकभाई, डॉ प्रकाश वानखेडे, बाळासाहेब चवरे,फेरोज खान,आनंता देवकते, योगेश चिलकावार, अमोल कोटुरवार, यांच्यासह व्यापारी, बांधव उपस्थित होते. विविध पक्षाच्या पदाधिकारी नेते यांनी पळशीकर परिवारांना भेटून सांत्वन केले आहे.
