हिमायतनगर प्रतिनिधी/ शहरातील प्रतिष्ठीत नागरिक प्रभावतीबाई शंकरराव पळशीकर वय ( 82 ) यांचे रविवारी वृध्दापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती, चार मुले , दोन मुली ,नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर सोमवारी सकाळी 11 वाजता शहरातील बोरगडी रस्त्यावरील हिंदू स्मशानाभुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्या शासकीय कंत्राटदार सुरेश पळशीकर,व्यापारी रमेश पळशीकर, संदीप पळशीकर,संतोष पळशीकर यांच्या मातोश्री होत्या...
पत्रकार संघाकडून भावपूर्ण श्रध्दांजली
