नांदेड- कै.सौ.कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगनात कुसुम महोत्सव साजरा करण्यात आला .संगीत क्षेत्रात महिला म्हणून अतिशय सुमधुर गायनातून श्रोत्यांची मने जिंकली महाराष्ट्रभर आपल्या कलेची छाप त्यांच्या मंजूळ स्वरातून पाडली त्यांच्या कलेची दखल घेऊन त्यांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महीलांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यामध्ये संगीत क्षेत्रात आपल्या गायनाने नांदेड जिल्हाच नव्हे तर मराठवाडा ,महाराष्ट्र राज्य व राज्याबाहेर देखील आपल्या सुमधूर आवाजाने स्वरनिनाद संगीत संचाच्या माध्यमाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे सौ.शिवकांता प्रणव पडोळे यांना माजि राज्यमंत्री आ.डि.पि.सावंत यांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, कार्यक्रम संयोजिका माजी आ.सौ.अमिता चव्हाण,श्री जया चव्हाण, सुजया चव्हाण, मा.आ.अमरनाथ राजुरकर अनेकांची उपस्थिती होत. गायिका शिवकांता पडोळे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संगीत क्षेत्रातील कलाकारांनी कौतुक केले आहे.
