मंगरूळ सह ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार- आ. जवळगावकर

मंगरूळ पुलाचा प्रश्न मार्गी पावसाळ्यातील धोका टळणार
हिमायतनगर प्रतिनिधी/( दत्ता पुपलवाड)मंगरूळ, वारंगटाकळी पुल गेल्या काही वर्षांपासून धोकादायक बनला होता पावसाळ्यात या पुलावरून पुराचे पाणी असल्याने तासनतास रात्री अपरात्री ताटकळत बसावे लागत होते या पुलाच्या कामाचा प्रश्न आ. जवळगावकर यांनी मार्गी लावला आहे. या उदघाटन प्रसंगी जवळगावकर म्हणाले की मंगरूळ सह ग्रामीण भागाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणार असल्याचे सांगितले आहे.
आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून टेंभी ,सवना, मंगरूळ ,वारंगटाकळी खैरगाव, या गावाअंतर्गंत च्या पुलासाठी निधी मंजूर केला त्या कामाचे रविवारी आ. जवळगावकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे. टेंभी येथे ग्रामस्थांनी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांचा सत्कार केला .

मंगरूळ पुलाचे उदघाटन झाल्यानंतर मंगरूळ ग्रामस्थांनी जवळगावकर यांचा सत्कार केला. या उदघाटन प्रसंगी बोलताना जवळगावकर म्हणाले की ग्रामीण भागाच्या विकासासाठी नेहमी अग्रेसर आहे . मंगरूळ सह अनेक गावच्या नागरीकांना पावसाळ्यात जिव धोक्यात घालून जावे लागत होते. आता पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम होणार असून नागरीकांना पुराचा धोका होणार नाही आणि ताटकळत बसावे लागणार नाही मंगरूळ सह या भागातील आणखी राहिलेली कामे येणाऱ्या काळात पुर्ण करू असेही आ. जवळगावकर म्हणाले यावेळी उपअभियंता सुधीर पाटील,सुभाष राठोड , शेख रफिकभाई,परमेश्वर गोपतवाड, गणेश शिंदे,जनार्दन ताडेवाड, कानबा पोपलवार,गजानन सुर्यवंशी, निलेश पाटील सुर्यवंशी, जिवन जैस्वाल,दयाळगिर गिरी,विठ्ठल सादलवाड, अवधूत पाटील,योगेश चिलकावार,संजय माने,संतोष अंबेकर, गिरीश महाराज,प्रदीप जाधव, नारायण पैलवाड, आनंद मुतनेपवाड, वैजनाथ चपलवाड, नाईक,सुभाष बलपेलवाड, दत्ता पुपलवाड, प्रविण जाधव, विठल गुंठेवाड, यांच्यासह मंगरूळ, वारंगटाकळी ,खैरगाव ,सवना,टेंभी चे ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.