आ. जवळगाकरांच्या प्रयत्नांने दरेसरसम पवना वाशी गावच्या रस्त्याचा प्रश्न सुटला - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दहा कोटी पन्नास लाख मंजूर-

हिमायतनगर प्रतिनिधी/दरेसरसम, पवना, वाशी या रस्त्याचा गेल्या अनेक वर्षापासून प्रश्न आ. जवळगाकरांच्या प्रयत्नांने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जवळपास दहा कोटी पन्नास लाख रुपये या कामासाठी मंजूर झाले असून प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड यांनी दिली आहे. 
      हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.आ.जवळगावकर यांच्या प्रयत्नातून मतदारसंघातील ग्रामीण रस्ते आता विकसित होणार आहेत. आणि या भागातील नागरीकांचा दळणवळणाचा होणारा त्रास आता दुर होणार आहे. सदरील रस्ता सरसम ते पवना दरेसरसम, वाशी जाणारा मुख मार्ग आहे. 
  ह्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असल्याने या भागातील नागरिक हैराण होते. वाहनधारकांसह शेतकऱ्यांचा आजपर्यंत खड्डयाचा त्रास सोसावा लागला आहे. सदरील रस्ता डांबरीकरण करण्यासाठी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या कडे मागणी केल्यानंतर आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी या भागातील नागरीकांची मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जवळपास दहा कोटी पन्नास लाख रुपये मंजूर केले आहेत. सदरील कामाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. 
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ता मंजूर केला असल्याने या भागातील पवना, वाशी, दरेसरसम येथील सरपंच नागरीकांनी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांचा सत्कार केला आहे. त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, सुभाष बलपेलवाड, सचिन राठोड, परमेश्वर जाधव, बाळू मुरगुलवाड, शेख फकिर, जयवंत जाधव, यांच्यासह या भागातील सरपंच उपसरपंच सदस्य नागरीकांनी आ. जवळगावकर यांचा सत्कार केला आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.