आ. जवळगावकर यांच्या प्रयत्नातून कारला वाशियांचा रस्त्याचा कायमचा प्रश्न सुटला- डांबरीकरणाचे काम पूर्ण- सुर्यवंशी यांच्या इन्फ्रा प्रायवेट कंपनीचे काम दर्जेदार

हिमायतनगर प्रतिनिधी/ कारला फाटा ते गावापर्यंत असलेल्या दोन कि. मी. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनधारक त्रस्त होते. पादचाऱ्यांना देखील चालणे अवघड बनले होते त्या रस्त्याचा आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नातून कायमचाच प्रश्न सुटला आहे. 

    नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर कारला पी. गाव असून फाटा ते गावापर्यंत दोन कि. मी. रस्त्याची अतिशय बिकट अवस्था निर्माण झाली होती.गावानजिक असलेला पुल धोकादायक बनला होता.सदरील पुलासह रस्ता मंजूर करावा अशी मागणी आ. जवळगावकर यांच्याकडे केली होती. 

 सदरील पुलाची व रस्त्याची परिस्थिती पाहता आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 80 लाखाहून अधिकचा निधी मंजूर केला होता.गावालगत असलेल्या पुलाची उंची वाढवून मुख्य रस्त्याचे काम केले आहे. गावातील रस्ता पुर्ण केला आहे. सदरील काम लिंबाजी सुर्यवंशी यांच्या इन्फ्रा प्रायवेट कंपनी कडून करण्यात आले आहे. रस्त्यासह पुलाचे कामही दर्जेदार केले असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.निलेश सुर्यवंशी, उमेश सुर्यवंशी,कामगार प्रविण जाधव,विठल पाटील,यांनी अतिशय दर्जेदार काम केल्याने त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. 
 सदरील रस्ता मंजूर करावा अशी मागणी सरपंच गजानन पाटील कदम,तंटामुक्तीचे अध्यक्ष डॉ गफार, प्रा.ज्ञानेश्वर घोडगे,सदस्य सोपान बोंपीलवार, रामेश्वर यमजलवाड, दत्ता चिंतलवाड, गजानन मिराशे, अ. रज्जाक, आडेलू चपलवाड, तुकाराम कदम, आनंद रासमवाड, लक्ष्मण चिंतलवाड, श्रीराम मुठेवाड, शिवाजी एटलेवाड,वसंत मिराशे, मारोती ढाणके, तुळशीराम वाठोरे, वैजनाथ यमजलवाड,जिवन रावते, अगंद सुरोशे,विठ्ठल आचमवाड, नाथा चवरे, मधुकर घोडगे, नागोराव गाडेकर, यांच्यासह ग्रामस्थांनी मागणी केली होती. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.