हिमायतनगर प्रतिनिधी/ नांदेड न्यूज लाईव्ह चे संपादक अनिल मादसवार यांच्या वडिल कै. लक्ष्मण नरहरी मादसवार यांचे बुधवारी दु:खद निधन झाले आहे. त्यांच्यावर गुरूवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
त्यांच्या निधनाचे वृत कळताच आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी शुक्रवारी संपादक अनिल मादसवार यांच्या निवासस्थानी भेट देऊन मादसवार कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. तर अंत्यविधीसाठी माजी खा. सुभाष वानखेडे, शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी उपस्थित राहून मादसवार कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.
आ. जवळगावकर यांच्या सोबत प्रथम नगराध्यक्ष अ. अखिल अ. हमिद,माजी संचालक शेख रफिकभाई, शहराध्यक्ष संजय माने,ज्ञानेश्वर शिंदे, अ. बाकी. योगेश चिलकावार, यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
