शासनाच्या प्रोत्साहन योजनेचा हिमायतनगर शहरातील एका शेतकऱ्यांना मिळाला लाभ- बॅंकेकडून शेतकऱ्यांचा सन्मान

हिमायतनगर प्रतिनिधी (सोपान बोंपीलवार) 
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदान मिळणार असल्याची घोषणा  केली असून या योजनेचा हिमायतनगर शहरातील एका शेतकऱ्यांस लाभ मिळाला असून भारतीय स्टेट बँकेच्या वतीने त्या महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

    2019-20-21 या तीन वर्षातील किमान 2 वर्षे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार असल्याचे घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आली आहे.नियमीत कर्जपरत या प्रोत्साहन पर योजनेत हिमायतनगर तालुक्यातील एकुण 104 शेतकरी आहेत .यापैकी  शेतकरी सौ. रजनी गंगाधर मामीडवार हे शेतकरी पात्र ठरले आहेत.

या महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर योजनेचा लाभ मिळाला असल्याने शुक्रवारी भारतीय स्टेट बँकेच्या बँकेत शाखा अधिकारी अमेय बर्वे, अभय कोलगे, प्रतिक चहांडे, निधी सारंग, मिनल भोयर, शिवानी खापेकर, प्रदीप जाधव,अनिल रिंगणमोडे,बालाजी बारडकर यांच्या हस्ते सन्मान करून बँकेचे प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे. प्रोत्साहन पर योजनेत समाविष्ट तालुक्यातील शेतकऱ्यांची यादी बॅंकेच्या वतीने शासनाकडे पाठविण्यात आली असून उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच लाभ मिळणार असल्याची माहिती शाखा अधिकारी बर्वे यांनी सांगितले आहे.  
 






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.