हिमायतनगर प्रतिनिधी/ नांदेड न्युज लाईव्ह चे संपादक अनिल मादसवार यांचे वडील कै. लक्ष्मण नरहरी मादसवार यांचे बुधवारी वृध्दापकाळाने निधन झाले त्यांच्यावर गुरूवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या निधनाचे वृत कळताच नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोवर्धन बियाणी यांनी शनिवारी अनिल मादसवार यांच्या निवासस्थानी हिमायतनगर येथे भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी प्रजावणीचे पत्रकार रविंद्र संगणवार, प्रजावणीचे भोकर प्रतिनिधी मनौजसिंह चव्हाण,पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता शिराणे, जेष्ठ पत्रकार प्रकाश जैन, गोविंद गोडसेलवार, अनिल नाईक, शुद्धोधन हानवते, पत्रकार बांधव उपस्थित होते.
